‘मुख्तार अन्सारींना तुरुंगात विष दिले’ ; उमर अन्सारीची सर्वोच्च न्यायालयाची धाव ; न्यायालयाकडून उत्तर प्रदेश सरकारला नोटीस

Mukhtar Ansari । राजकीय नेते मुख्तार अन्सारी यांच्या मृत्यूला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय. तुरुंगातच त्यांना विष प्राशन केल्याचा आरोप मुख्तारचे कुटुंबीय सुरुवातीपासून करत आहेत. यासाठी अन्सारी कुटुंबीयांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुख्तार अन्सारी यांच्या मृत्यूसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्तार यांचा मुलगा उमर अन्सारीची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी कोठडीतील मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला.
सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी, मुख्तार यांना तुरुंगात विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. बांदा तुरुंगात मुख्तार अन्सारी यांच्या जीवाला धोका असल्याच्या भीतीने आपण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, असे सिब्बल म्हणाले. मात्र आता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही याचिका निष्प्रभ ठरली आहे. अशा स्थितीत त्यांना या याचिकेत सुधारणा करून नवीन अर्ज दाखल करायचा आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाची परवानगी मागितली.
न्यायालयाकडून उत्तर प्रदेश सरकारला नोटीस Mukhtar Ansari ।
उमर अन्सारीच्या अर्जात सुधारणा करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. यूपी सरकारच्या उत्तरानंतर, सुधारित अर्ज सुनावणीसाठी स्वीकारायचा की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर याने 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, आपल्या वडिलांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांची यूपी तुरुंगातून बदली करण्यात यावी.
मुख्तार यांना तुरुंगात नेण्यात आले अन् त्यांचा मृत्यू झाला Mukhtar Ansari ।
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठासमोर उमर अन्सारीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान कपिल सिब्बल म्हणाले की, मुख्तार यांना तुरुंगात नेण्यात आले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यावर न्यायमूर्ती रॉय म्हणाले की, आम्ही त्याला परत आणू शकत नाही. याला उत्तर देताना सिब्बल म्हणाले की, या देशात लोकांना अशी वागणूक दिली जाऊ शकत नाही.
याचिकाकर्त्याला ज्याची भीती होती तेच घडले -सिब्बल
एएसजी नटराज यांनी सरकारची बाजू मांडताना सांगितले की, सुरुवातीला केलेल्या मागण्यांवर तोडगा निघाला आहे. सिब्बल यांनी तात्काळ निदर्शनास आणून दिले की याचिकाकर्त्याला ज्याची भीती होती ते घडले. उमर अन्सारी मुख्तारच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल आणि त्याच्या मृत्यूबद्दल बोलले, असे ज्येष्ठ वकिलाला म्हणायचे होते.
त्यावर उत्तर देताना न्यायमूर्ती रॉय म्हणाले की, तुम्ही (कपिल सिब्बल) म्हणता की दोषी कैद्याला तुरुंगात वैद्यकीय उपचार दिले गेले नाहीत, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. उमर अन्सारीच्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे.





