महागठबंधनात भूकंप! मुकेश साहनींची भाजपसोबत हातमिळवणी? ; तेजस्वींना बसणार धक्का

Mukesh Sahni joins BJP । बिहार सरकारचे माजी मंत्री आणि विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी हे तेजस्वी यादव याना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. कारण ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साठी त्याचेच एक विधान कारणीभूत ठरले आहे. जर असे झाले तर सर्वात मोठा धक्का तेजस्वी यादव यांना बसेल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी असा दावा केला आहे की महागठबंधनात समाविष्ट असलेला एक पक्ष त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांनी उघडपणे मुकेश साहनी यांचे नाव घेतले नाही.
भाजप नेते दिलीप जयस्वाल यांनीआज माध्यमांशी बोलताना, आमच्या युतीमध्ये पाच पांडव (भाजप, जेडीयू, एलजेपी रामविलास, एचएएम आणि आरएलएम) आहेत. एक त्यांच्याशी (महागठबंधन) युतीत आहे जे इकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते महागठबंधनाचे एक मजबूत भागीदार आहेत. जर त्यांनी आदराने बोलले तरच आपण त्याचा विचार करू असेही त्यांनी यावेळी म्हटले. त्यांनी मुकेश साहनीकडे बोट दाखवत आहे का? या प्रश्नावर त्यांनी, मी कोणाबद्दलही काहीही सांगू शकत नाही. असे म्हटले आहे.
महागठबंधनात उपमुख्यमंत्रीपदाची साहनीकडून मागणी Mukesh Sahni joins BJP ।
बिहारमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आजकाल मुकेश साहनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी असे म्हटले आहे की, जर महागठबंधन सरकार स्थापन झाले तर एकीकडे तेजस्वी यादव मुख्यमंत्री असतील, तर दुसरीकडे ते स्वतः उपमुख्यमंत्रीपद भूषवतील. मात्र, आरजेडी किंवा तेजस्वी यादव यांनी याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही. दिलीप जयस्वाल यांच्या विधानामुळे आता बिहारच्या राजकीय वर्तुळात एक नवीन वाद सुरू झाला आहे.
मुकेश साहनी यांनी ६० जागांवर केला दावा Mukesh Sahni joins BJP ।
विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांनीही महागठबंधनतील जागांवर दावा केला आहे. अलिकडेच कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले होते की, “आम्ही ६० जागांवर निवडणूक लढवू आणि त्यानंतरच आम्ही ४० ते ५० जागा जिंकू शकू. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ४० जागा जिंकायच्या आहेत. निषाद समाजाची आरक्षणाची मागणी तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा त्यांच्या पक्षाचे किमान ४० आमदार असतील. आता दिलीप जयस्वाल यांच्या विधानावर व्हीआयपी प्रमुख साहनी किंवा पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे बाकी आहे.





