Muhammadu Buhari : नायजेरियाचे माजी अध्यक्ष बुहारी यांचे निधन

लागोस (नायजेरिया) : नायजेरियाचे माजी अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. बुहारी यांनी दोन वेळा देशाचे लष्करी अध्यक्ष आणि लोकशाही मार्गाने नियुक्त झालेले अध्यक्ष म्हणूनही देशाचे नेतृत्व केले होते. लंडनमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांचे रविवारी निधन झाले.
१९८३ साली लष्कराच्या उठावानंतर ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते. मात्र २० महिन्यांच्या आतच लष्कराने त्यांना पायउतार केले होते. २०१५ मध्ये चौथ्या प्रयत्नात ते निवडून आले. तेव्हा ते तेथे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे पहिले विरोधी उमेदवार बनले.
ईशान्येकडील बोको हरामच्या अतिरेकी हिंसाचाराच्या काळात आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या काळात त्यांनी २०२३ पर्यंत देशाचे नेतृत्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदू बुहारी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बुहारी यांचा विवेक, प्रेमळपणा आणि भारत-नायजेरिया मैत्रीप्रती त्यांची अढळ बांधिलकी सदैव स्मरणात राहील, असे मोदी म्हणाले.





