ढाका : बांगलादेशात गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने आज एका विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जतिया संगसद किंवा संसद कॉम्प्लेक्सच्या आवारात जुलै उठाव या नावाने झालेल्या या रॅलीमध्ये अध्यक्ष डॉ. मुहम्मद युनूस यांनी जुलै जाहीरनाम्याचे वाचन केले. बांगलादेशच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी जुलै उठावाचे स्मरण देशवासियांनी कायम ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. २०२४ चे जनआंदोलनाला योग्य दर्जा आणि घटनात्मक वैधता प्राप्त करून दिली जाईल. या जुलै जाहीरनाम्यामध्ये घटनात्मक सुधारणांचे प्रतिबिंब असेल. राष्ट्रीय पातळीवरील आगामी नवीन सरकारच्या धोरणांची दिशाही यामध्ये स्पष्ट असेल, असे युनूस म्हणाले. युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावाला घटनात्मक मान्यता देऊ इच्छित आहे. ही मान्यता जुलै जाहीरनामा म्हणून ओळखली जाणार आहे. एकंदर १ हजार हूनपेक्षा अधिक शब्दांच्या या जाहीरनाम्यात पदच्युत फॅसिस्ट राजवटीच्या कारवायांचे तपशीलवार वर्णन केले आहे. म्हणूनच बांगलादेशच्या माजी राज्यकर्त्यांना जबरदस्तीने बेपत्ता करणे, खून करणे, वैयक्तिक आणि सामूहिक हत्याकांड करणे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी खटल्याच्या कक्षेत आणण्याची जनतेची तीव्र इच्छा आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०२४ च्या जन उठावातील विजयाच्या प्रसंगी बांगलादेशातील लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करण्यासाठी हा जाहीरनामा लिहिला गेला आहे, असे युनूस म्हणाले. या र२लीच्या निमित्ताने राजधानी ढाकामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याआवामी लीगच्या कोणाही कार्यकर्त्याकडून या समारंभात विघ्न आणले जा नये, यासाठी पोलिसांच्या वाहनांकडून शहरभर गस्त घातली जात होती.