IPL 2024 : एमएस धोनीने मुंबई विरुद्ध रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटर…

IPL 2024 (MI vs CSK Match 29, MS Dhoni Records) : मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या महेंद्रसिंग धोनीने हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग 3 षटकार ठोकले. कॅप्टन कूल 4 चेंडूत 20 धावा करून नाबाद परतला. या तूफानी खेळीनंतर एमएस धोनी खूपच चर्चेत आला, पण याशिवाय महेंद्रसिंग धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वास्तविक, यष्टिरक्षक म्हणून 250 आयपीएल सामने खेळणारा धोनी एकमेव क्रिकेटर आहे. ( MS Dhoni created history ) आतापर्यंत इतर कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. धोनीने आतापर्यंत 256 आयपीएल सामने खेळले असले तरी 250 सामन्यांमध्ये त्याने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली आहे.
धोनीनंतर या खेळाडूंची नावे…
त्याचबरोबर दिनेश कार्तिक या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. दिनेश कार्तिकने आत्तापर्यंत IPL चे 248 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 248 सामने यष्टीरक्षक म्हणून खेळले आहेत. यानंतर ऋद्धिमान साहा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलचे 165 सामने खेळलेल्या साहाने 144 सामन्यांमध्ये यष्टिरक्षकाची भूमिका बजावली आहे. तर पार्थिव पटेल 122 सामन्यांमध्ये यष्टीरक्षणासह चौथ्या स्थानावर आहे. रॉबिन उथप्पा पाचव्या क्रमांकावर आहे. रॉबिन उथप्पा, जो अनेक आयपीएल संघांसाठी खेळला आहे, त्याने एकूण 205 सामने खेळले, ज्यामध्ये तो यष्टीरक्षक म्हणून 114 सामन्यांमध्ये दिसला आहे.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
असा आहे महेंद्रसिंग धोनीचा आयपीएल प्रवास…
वास्तविक, महेंद्रसिंग धोनीने आत्तापर्यंत IPL चे 256 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 226 सामने चेन्नई सुपर किंग्सचे होते तर त्याने 30 सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले होते. धोनी आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीपासून म्हणजेच 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे, पण आयपीएल 2016 आणि 2017 मध्ये कॅप्टन कूल रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी 5 आयपीएल जेतेपदे जिंकली. धोनीशिवाय फक्त रोहित शर्माने कर्णधार म्हणून 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.





