CSK vs SRH : माहीचा नवा विक्रम! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच केला खास पराक्रम

CSK vs SRH MS Dhoni Becomes 4th Indian to Play 400 T20 Matches : आयपीएल २०२५ मधील ४३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यासाठी मैदानात उतरताच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने एक खास पराक्रम केला आहे.
४३ वर्षीय चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ४०० सामने खेळणारा २५ वा खेळाडू ठरला आहे. या खास क्लबमध्ये आणखी तीन भारतीय खेळाडू रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि विराट कोहली यांचा समावेश आधीच झाला आहे. धोनी हा टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ३२५ टी-२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे आणि १९० सामने जिंकले आहेत.
Yet another feather in the cap 👏
MS Dhoni takes to the field in his 4⃣0⃣0⃣th T20 match 🙌
Updates ▶ https://t.co/26D3UalRQi#TATAIPL | #CSKvSRH | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/rUODpHXxE1
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
सर्वाधिक टी-२० सामने खेळणारे टॉप-५ खेळाडू :
- किरॉन पोलार्ड – वेस्ट इंडिज – ६८४
- ड्वेन ब्राव्हो – वेस्ट इंडिज -५८२
- शोएब मलिक -पाकिस्तान -५४२
- सुनील नरेन – वेस्ट इंडिज -५२५
- आंद्रे रसेल – वेस्ट इंडिज -५२३
हेही वाचा – RCB vs RR : कॅपने चेंडू उचलला, तरी आरसीबीला दंड नाही; काय आहे कारण? जाणून घ्या नियम
भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, त्याने आतापर्यंत ४५६ सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ४१२ टी-२० सामने खेळले आहेत. तर विराट कोहली ४०७ सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आता एमएस धोनी या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. तो ४०० टी-२० सामने खेळण्याचा टप्पा गाठणारा चौथा भारतीय ठरला आहे.
हेही वाचा – IPL 2025 : गावस्कर-चंपक जोडीने गाजवलं मैदान, VIDEO होतोय व्हायरल
सर्वाधिक टी-२० सामने खेळणारे भारतीय टॉप-४ खेळाडू :
- रोहित शर्मा – ४५६
- दिनेश कार्तिक -४१२
- विराट कोहली – ४०७
- एमएस धोनी – ४००





