Mrunal Thakur: ‘आई-वडिलांची लाडकी लेक’! मृणाल ठाकूरने शेअर केला खास PHOTO
Mrunal Thakur: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मृणालने आपली वेगळी ओळख निर्माण केली

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर आई-वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. यातील तिचा साधेपणा अनेकांना आवडला आहे. हा फोटो केवळ एक कौटुंबिक क्षण न राहता मृणालच्या चाहत्यांसाठीही खास ठरला आहे.
या फोटोसोबत तिने ‘आई-वडिलांची लाडकी लेक’ असं कॅप्शन दिलं आहे. मृणालच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, तिच्या आई-बाबांचा साधा आणि आपुलकीचा अंदाजही नेटकऱ्यांना आवडला आहे.
मृणाल ठाकूरने ‘मुझसे कुछ कहती… ये खामोशियां’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील बुलबुल या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. ‘लव्ह सोनिया’मधील भूमिकेने तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मृणालने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
View this post on Instagram
‘सीता रामम’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली. आता ती लवकरच ‘पूजा मेरी जान’ आणि ‘राका’ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, मृणाल मुळची महाराष्ट्रातील धुळे येथील आहे.





