Mrunal Thakur: नवीन वर्षाआधी मृणाल ठाकुरने कामातून ब्रेक घेत एन्जॉय केली सुट्टी; ट्रॅव्हल फोटो व्हायरल

Mrunal Thakur: नवीन वर्षाच्या आधी अभिनेत्री मृणाल ठाकुरने कामातून थोडा ब्रेक घेत सुट्टी एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणं किती गरजेचं आहे, हे मृणालने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दाखवून दिलं आहे.
मृणालने इन्स्टाग्रामवर तिच्या ट्रिपमधील काही फोटो आणि एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच रिलॅक्स आणि आनंदी दिसत आहे. एका फोटोमध्ये ती स्टायलिश चष्मा घालून पोझ देताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला उभी राहून हसताना दिसते. व्हिडीओमध्ये ती आइसक्रीमचा आनंद घेताना दिसत आहे.
या फोटोंसोबत मृणालने “खूप गरजेचं” असं छोटंसं कॅप्शन लिहिलं आहे. यावरून फॅन्सचा अंदाज आहे की, फिरणं, मनाप्रमाणे खाणं आणि मानसिक शांततेसाठी असा ब्रेक तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. नवीन वर्षापूर्वी घेतलेला हा ब्रेक तिला फ्रेश होण्यासाठी मदत करणार आहे.
View this post on Instagram
मृणालच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. कमेंटमध्ये अनेकांनी हार्ट इमोजी टाकले आहेत. काहींनी तिला क्यूट म्हटलं आहे, तर काहींनी ‘एक्सप्रेशन क्वीन’ आणि ‘ब्युटी क्वीन’ असं संबोधलं आहे. तिचा साधा आणि आनंदी लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर मृणाल लवकरच अदिवी शेष आणि अनुराग कश्यप यांच्यासोबत ‘डकैत’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘दो दिवाने सहर’, ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘पूजा मेरी जान’ या चित्रपटांतही ती महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे.





