Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या ‘दो दीवाने शहर में’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. २० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत असून, प्रमोशनदरम्यान मृणालने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अनुभव शेअर केला. या मुलाखतीत तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल आणि त्याच्या असुरक्षिततेबद्दल मोकळेपणाने सांगितले. मृणाल ठाकूर अलीकडे को-स्टार सिद्धांत चतुर्वेदी सोबत एका शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी चित्रपटासोबतच तिच्या पर्सनल लाइफबाबतही प्रश्न विचारण्यात आले. मृणालने सांगितले की, तिचा स्कॅन्डिनेव्हियन एक्स बॉयफ्रेंड तिला इतर देखण्या अभिनेत्यांसोबत काम करताना पाहून असुरक्षित होत असे. ती म्हणाली की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात ती हृतिक रोशन सोबत ‘सुपर ३०’ या चित्रपटात काम करत होती. त्यानंतर तिने शाहिद कपूर सोबतही शूटिंग केल. त्या काळात तिचे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप होते. मृणालच्या म्हणण्यानुसार, तिच्या एक्सला वाटायचे की ती खूप ‘गुड लुकिंग’ स्टार्ससोबत वेळ घालवत आहे. त्यामुळे तो स्वतःची तुलना करू लागला. Mrunal Thakur या असुरक्षिततेमुळे त्याने जिमला जाणे सुरू केले. त्याने तब्बल १५ ते १७ किलो वजन कमी केले आणि मसल्स तयार केले. मात्र काही काळानंतर त्याने वर्कआउट बंद केले, जास्त खाणे सुरू केले आणि सुमारे २० किलो वजन वाढवले. एक दिवस त्याने मृणालला सांगितले की तो “बरोबरी करत करत थकला आहे.” त्यावर मृणालने स्पष्ट सांगितले की, “मी तुला कधीच वजन कमी करायला सांगितले नव्हते. ही पूर्णपणे तुझी इनसिक्युरिटी होती.” मृणालने पुढे सांगितले की तिने कधीच त्याला असे वाटू दिले नाही की तिला ‘मसल्सवाला’ किंवा विशिष्ट शरीरयष्टीचा जोडीदार हवा आहे. तिच्या मते, नात्यात विश्वास आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. तुलना आणि असुरक्षितता नात्याला कमकुवत करतात. दरम्यान, मृणालच्या नावाची चर्चा अभिनेता धनुष सोबत लग्नाच्या अफवांमुळेही होत आहे. एका मुलाखतीत तिने या अफवांवरही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी? नाही! १४ फेब्रुवारी किंवा १ एप्रिलसारखी ही एखादी अफवा असावी. मला माहित नाही हे कोणी सुरू केले. मला कोट करण्यात आले, पण मी असे काहीही बोलले नव्हते. हे थोडे भीतीदायक आहे.” एकूणच, मृणाल ठाकूरने आपल्या आयुष्यातील हा अनुभव शेअर करताना नात्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्पष्ट संवाद किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले. करिअरमध्ये यश मिळवत असताना वैयक्तिक आयुष्यातील अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ अनेक कलाकारांवर येते. मात्र मृणालने या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत पुढे जाण्याचा मार्ग निवडला आहे.