Mrunal Thakur : “काय बोली रायनी….”; मृणाल ठाकूरने अहिराणी भाषेत साधला संवाद
Mrunal Thakur : एका कार्यक्रमासाठी आलेल्या रिपोर्टरने मृणाल ठाकूरसोबतअहिराणी भाषेत साधला संवाद

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण मूळची मराठी असलेली मृणाल ठाकूर अहिराणी भाषा बोलताना पाहायला मिळाली आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘दो दिवाने सहर मै’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या एका रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत संवाद साधला.
यावेळी रिपोर्टरने अहिराणी भाषेत अभिनेत्रीशी संवाद साधत “तुले सर्वांत जास्त काय आवडस? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी?” असं विचारलं.
यावर मृणालने हसत-हसत उत्तर दिले, “काय बोली रायनी. अडीच वाजीगयना, जेवायना शे मले.” मग रिपोर्टरने तिला ‘काय खायला आवडेल’, असं विचारलं. त्यावर मृणाल म्हणाली, “वांग्यानं भरीत पहिले. वरण, एखादं बट्ट जोडे.” Mrunal Thakur :
View this post on Instagram
पुढे मृणालने त्या रिपोर्टरला विचारलं, “वरण बट्टी लायेल शे ना तू?” मग ती रिपोर्टर म्हणते, “मी आता आणलं नाहीय; पण तू माझ्याबरोबर चल मी तुला खायला देते”. त्यावर मृणाल म्हणते, “चल, येस मी… वरण बट्टी, तूप आणि लिंबूशिवाय नाही होणार हां…” मृणालने तिच्या अहिराणी भाषेतल्या उत्तराने सर्वांनाच चकीत केले. ती अहिराणी बोलत असताना सिद्धांत देखील आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होता. Mrunal Thakur
दरम्यान, ‘दो दिवाने सहर मै’ या सिनेमात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची जोडी पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. Mrunal Thakur
हेही वाचा :






