Dacoit: ‘डकैत’चा टीझर रिलीज: प्रेम आणि विश्वासघाताची कथा, अॅक्शनचा तडका

यंदाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘डकैत’चा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. ‘डकैत: एक प्रेम कथा’ या नावाने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या टीझरमध्ये चित्रपटाचे प्रमुख कलाकार आदिवी शेष, मृणाल ठाकूर आणि अनुराग कश्यप यांची झलक पाहायला मिळते. प्रेम आणि विश्वासघाताभोवती फिरणारी ही कथा अॅक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण आहे.
1 मिनिट 1 सेकंदाच्या या टीझरची सुरुवात आदिवी शेषच्या व्हॉइस ओव्हरने होते. मृणाल ठाकूर दुखावलेली आणि अस्वस्थ दिसते, तर आदिवी शेष म्हणतो, “जूलियट, तुझ्यासोबत सगळ्यांनी खूप चुकीचं केलंय. ज्याच्यावर तू विश्वास ठेवलास, त्याने तुला फसवलं. पण आता काळजी करू नको, मी आलोय. आता कोणीच वाचणार नाही, फक्त तुझं नुकसान बाकी राहील.” टीझरमधून प्रेम आणि विश्वासघाताची कथा उलगडत असल्याचं दिसतं. अनुराग कश्यप यांची झलक नकारात्मक भूमिकेची चाहूल देते. हा चित्रपट येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
टीझरमध्ये आदिवी शेष रागावलेल्या अॅक्शन अवतारात दिसतो, तर मृणाल ठाकूर दुखी आणि अस्वस्थ आहे. एका दृश्यात ती आदिवी शेषच्या मागे लपताना दिसते. शेनिल देव दिग्दर्शित या चित्रपटात प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, सुनील, जैन मेरी खान आणि कामाक्षी भास्करला यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटात श्रुति हासन मुख्य भूमिकेत होती, पण तिने माघार घेतल्यानंतर मृणाल ठाकूरने तिची जागा घेतली. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.





