Satara: सौ. संजीवनी सोनवलकर यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
Satara बी द चेंज फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम शिर्डी येथे झाला. याप्रसंगी अहिल्यानगरचे सहायक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, अभिनेत्री निवेदिता पगार, विश्वरूप इंटरनॅशनलचे बाबासाहेब कापे, सैनिक फेडरेशनचे अरुण भंडारे, पंजाब नॅशनल बँकेचे नीलेश घोडेचोर, अमृत रोहोम, फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, सचिव सौ. रचना ढोकचौळे उपस्थित होते. सौ. संजीवनी सोनवलकर यांनी 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Satara: शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले (ता. फलटण) येथील शेतकरी कुटुंबातील प्रिन्सिपल सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना बी द चेंज फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बी द चेंज फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम शिर्डी येथे झाला. याप्रसंगी अहिल्यानगरचे सहायक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, अभिनेत्री निवेदिता पगार, विश्वरूप इंटरनॅशनलचे बाबासाहेब कापे, सैनिक फेडरेशनचे अरुण भंडारे, पंजाब नॅशनल बँकेचे नीलेश घोडेचोर, अमृत रोहोम, फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, सचिव सौ. रचना ढोकचौळे उपस्थित होते. सौ. संजीवनी सोनवलकर यांनी 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
वडवाडी (ता. खंडाळा) येथील अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम केले. सध्या त्या संतोषनगर (कात्रज, पुणे) येथील महात्मा फुले विद्यानिकेतन शिक्षण संस्थेच्या गगनगिरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देत त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते सक्षम व्हावेत, या दृष्टिकोनातून सौ. सोनवलकर यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
स्मार्ट क्लास, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, संगणक शिक्षण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. कृतीतून मूल्यशिक्षण, खेळ व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना व सर्जनशीलता विकसित करण्यासोबतच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीवरही त्यांनी भर दिला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक रतन माळी, अध्यक्षा सौ. स्मिताताई वाघ, सचिव रवींद्र वाघ यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सौ. संजीवनी सोनवलकर यांचे अभिनंदन केले. तसेच वडले ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ, सोनवलकर पाटील परिवार, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव सोनवलकर, डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.





