Satara: शिक्षणाशिवाय वडार समाजाची प्रगती होणार नाही; ना. शिवेंद्रसिंहराजे
Satara वडार पँथर संघटनेच्यावतीने येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात समाजाचा युवक आणि वधू- वर परिचय मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडार पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद इरकल होते.

Satara: आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हाच एकमेव प्रगतीचा मार्ग आहे. शिक्षणाअभावी वडार समाज पिछाडीवर आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वडार समाजाने मुला- मुलींना शिक्षणाचे महत्व पटवून दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय वडार समाजाची प्रगती होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी केले.
वडार पँथर संघटनेच्यावतीने येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात समाजाचा युवक आणि वधू- वर परिचय मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडार पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद इरकल होते.
यावेळी इंदापूरचे नगरसेवक अनिल पवार, माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे, नगरसेवक अंबादास धोत्रे, शेणोलीचे सरपंच नारायण शिंगाडे, पूजा सचिन कुराडे, भरत देवरासे, प्रमोद पवार, कुमार धोत्रे, महादेव जाधव, मनोहर मुधोळकर, विशाल पवार, योगेश पवार, सातारा जिल्ह्याचे नेते सोमनाथ धोत्रे, शैलेश जाधव, रमेश विटकर, श्रीकांत देवकर, सागर धोत्रे संदीप पवार, मच्छिंद्रनाथ जाधव, वनिता पवार, दीपक नलवडे, फिरोज पठाण, रवी माने, भाऊ पवार, आप्पासाहेब पवार, यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातार्यातील छत्रपती घराण्याचे व सातार्यातील वडार समाजाचे जुने ऋणानुबंध आहेत. अनेकांनी या शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. कर्तव्यवान आणि मनाने श्रीमंत असणार्या वडार समाजातील लोकांनी अनेक राजकीय कार्यक्रम घेतले असतील परंतु, समाजातील मुलांचे लग्न जुळवण्याचे हे कार्य स्तुत्य आहे. इतर समाजातील लोकांनी शिक्षण घेऊन अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. वडार समाजाचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणू असे आश्वासन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.
यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते वडार समाजाच्या वधू- वरांसाठीच्या अधिकृत वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले.





