‘मिसेस अँड मिस्टर…’; आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप उरकले लग्न; पाहा PHOTOS

Aditi Rao Hydari And Siddharth Marriage | अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न उरकले आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थसोबतच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून दोघे
एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडला.
या फोटोंमध्ये आदिती आणि सिद्धार्थ पारंपारिक पोशाखांमध्ये दिसत आहेत. यावेळी अभिनेत्रीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य परंपरेनुसार पांढरा कुर्ता घालून लुंगी नेसली होतीलग्नाचे फोटो शेअर करत अदितीने “तूच माझा सूर्य, तूच चंद्र आणि सगळे तारे.. अनंतकाळासाठी आपण एकमेकांचे झालो आहोत.. असंच हसत राहू कधीच मोठे व्हायला नको…कायम प्रेम, प्रकाश आणि जादू…मिसेस अँड मिस्टर अदू-सिद्धू.” कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
साऊथमधील १०० वर्ष जुन्या प्रसिद्ध मंदिरात ते लग्नबंधनात अडकल्याचं दिसत आहे. त्यांचं हे फोटोशूटही खूपच खास आहे. साधं पण तितकंच क्लासिक असं हे फोटोशूट आहे. आदिती-सिद्धार्थने २७ मार्च रोजी साखरपुडा केला होता. लग्नाप्रमाणे या दोघांनी साखरपुडा देखील गुपचूप उरकला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कलाकारांसह चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:
गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था – मुख्याधिकारी महेश रोकडे





