मुंबई – अभिनेत्री मृण्मयी देशपांडेला कोण ओळखत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर मृण्मयीने एकापेक्षा एक असे दर्जेदार चित्रपट आजपर्यंत दिले आहेत. सध्या ती आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांना विविध अपडेट देत असते. मृण्मयी सध्या महाबळेश्वरमध्ये वास्तव्याला असल्याचे समजते. यावेळी ती आपल्या बाहीनसह राहत आहे.
मृण्मयीने महाबळेश्वरमध्ये छान घर बांधले असून ती त्या ठिकाणी शेती देखील करते. मृण्मयी आपल्या सोशल मीडियावरून याबाबतचे अनेक फोटो देखील शेअर केलेले आहेत. मुंबईपासून आणि गर्दीपासून दूर राहून ती निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबियांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसते. मृण्मयीने शेती व्यवसायातच पुढे प्रगती करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
यासाठी मृण्मयीने काही हटके गोष्टी देखील सुरु केल्या आहेत. नवऱ्याच्या मदतीने मृण्मयी शेती करु इच्छित असणाऱ्या तरुणांसाठी त्यासंबंधिचे प्रशिक्षण देखील देते. अलिकडेच तिने एका कोर्सचं आयोजन देखील केलं होतं. यासह मृण्मयीने शेतीसोबतच निल अँड मोमो या नावाने हॅण्डमेड आणि ऑरगॅनिक साबणाचा व्यवसाय देखील सुरु केला आहे.