MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC News) आपल्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले माघार (ऑप्टींग आऊट) आणि संमती (पद नाकारणे/स्वीकारणे) हे पर्याय रद्द केले असून, हा निर्णय बुधवारपासून अंमलात आला आहे. एका निवेदनात आयोगाने म्हटले की, भरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यापूर्वी माघार घेण्याची तरतूद लागू करण्यात आली होती. या तरतुदीमुळे निवड यादीत समावेश असलेल्या उमेदवारांना (MPSC News) भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने माघार घेणे शक्य होत होते. आयोगाच्या बैठकीत झालेल्या विचारमंथनानंतर एमपीएससीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी माघार आणि संमती हे दोन्ही पर्याय यापुढे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MPSC News एकल संवर्ग पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी कायम राहील, मात्र बहु-संवर्ग भरती प्रक्रियेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी तयार केली जाणार नाही. बहु-संवर्ग भरती प्रक्रियेमध्ये जर एखाद्या उमेदवाराला आधीच एखाद्या पदावर (MPSC News) नियुक्ती मिळाली असेल आणि त्याने आपल्या पसंतीक्रमानुसार त्याच पदाचा किंवा त्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या पदाचा पर्याय निवडला असेल, तर त्या उमेदवाराचा विचार त्या विशिष्ट पदासाठी किंवा त्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या कोणत्याही पदासाठी शिफारस करण्याकरिता केला जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.