MPL 2024 : ईगल नाशिक टायटन्सचा रत्नागिरी जेट्सला पराभवाचा धक्का

Maharashtra Premier League 2024 (Match No 13) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत धनराज शिंदे(नाबाद ४४)धावांच्या खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ९ गडी राखून पराभव करत विजयी घौडदौड रोखली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आज दोन्ही संघात प्रत्येकी ५ षटकांचा सामना खेळविण्यातआला.
T20 World Cup 2024 : बुमराह ठरला गेमचेंजर..! थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकवर 6 धावांनी विजय…
गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या रत्नागिरी जेट्स संघाची विजयी मालिका ईगल नाशिक टायटन्स संघाने रोखत तिसरा विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने ५षटकात २बाद ८३धावा केल्या. यात धीरज फटांगरे २३, निखिल नाईक नाबाद २४, प्रीतम पाटील २१ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
धनराज शिंदेच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाला आपला पहिला पराभव पत्करावा लागला. #MPL #MPL2024 #MahaCricket #MCA pic.twitter.com/meFYdmRfMt
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) June 9, 2024
हे आव्हान ईगल नाशिक टायटन्स संघाने अवघ्या ४षटकात १बाद ८५धावा करून पूर्ण केले. धनराज शिंदेने १३चेंडूत नाबाद ४४धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याने १चौकार व ६षटकारांची आतषबाजी केली. त्याला मंदार भंडारीने १३चेंडूत २चौकार व ३ षटकारासह नाबाद २९ धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १९चेंडूत ८० धावांची आक्रमक भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
𝐄𝐗𝐏𝐄𝐂𝐓 𝐓𝐇𝐄 𝐔𝐍𝐄𝐗𝐏𝐄𝐂𝐓𝐄𝐃! 🤯🤯🤯
Eagle Nashik Titans beat the Ratnagiri Jets by 9 wickets in a 5-over match of #MPL2024
Watch the match LIVE on MPL’s YouTube Channel
Link in the bio 🔗#MaharashtraPremierLeague2024 #ThisIsMahaCricket #MaharashtraCricket… pic.twitter.com/e84dI2vZUm
— MPLT20Tournament (@mpltournament) June 9, 2024
संक्षिप्त धावफळक – रत्नागिरी जेट्स : ५ षटकात २ बाद ८३ धावा. (धीरज फटांगरे २३, निखिल नाईक नाबाद २४, प्रीतम पाटील २१, हरी सावंत १-१८) पराभुत वि. ईगल नाशिक टायटन्स : ४ षटकात १ बाद ८५ धावा. (धनराज शिंदे नाबाद ४४, मंदार भंडारी नाबाद २९, दिव्यांग हिंगणेकर १-३६). सामनावीर – धनराज शिंदे.





