‘भाजपचा बॉस हिंदू नाहीये का?’, मोहन भागवतांचे नाव घेत शिंदेंच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut | उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ मेळा संपन्न झाला आहे. महिनाभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्याला जगभरातील कोट्यावधी लोकांनी हजेरी लावली. महाकुंभ मेळ्यादरम्यान कोट्यावधी भाविकांनी पवित्र स्नान केले. अनेक राजकीय नेते, कलाकार देखील महाकुंभला गेले होते. मात्र, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे महाकुंभला गेले नाहीत. यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला होता.
हिंदू आहेत तर मग महाकुंभला का गेले नाहीत? असा प्रश्न शिंदेंनी विचारला होता. एकनाथ शिंदेंच्या या प्रश्नाला शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. शिंदेंनी हाच प्रश्न विचारण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना दाखवावी, असे म्हणत राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे कमाल की चीज है.
खुद को हिंदुवादी कहनेवाले उद्धव ठाकरे कुंभ क्यो नहीं गये..ये शिंदेका सवाल है.
very good.
शिंदेने ये सवाल आदरणीय आरएसएस प्रमुख मोहन भागवत जी से करनेकी हिम्मत दिखानी चाहीये!
क्या bjp की बॉस हिंदू नहीं है?@mieknathshinde
@Dev_Fadnavis pic.twitter.com/TXgeWcaMej— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2025
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे महाकुंभला न गेल्याने एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला होता. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. जर ते हिंदू आहेत तर मग ते कुंभमेळ्यात स्नान करायला का गेले नाहीत? कोट्यावधी लोकांना महाकुंभ मेळ्यात स्नान केले. मग राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी कुंभमेळ्यात येणे का पसंत केले नाही?, असा सवाल शिंदेंनी विचारला होता.
‘हाच प्रश्न प्रमुख मोहन भागवतांना विचारावा’
एकनाथ शिंदे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत ‘हाच प्रश्न प्रमुख मोहन भागवतांना विचारावा’, असे म्हटले आहे.
‘एकनाथ शिंदे देखील कमाल आहेत. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे उद्धव ठाकरे हे कुंभ मेळ्याला का गेले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु, शिंदेंनी हाच प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना विचारण्याची हिंमत दाखवायला हवी. भाजपचा बॉस हिंदू नाहीये का?’, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंच्या टीकेला उत्तर दिले आहे.





