खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात; टेम्पो आणि कारची धडक

Ravindra Waikar car Accident | शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. यावेळी खासदार वाईकरही गाडीतच होते.
रविवारी मध्यरात्री पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच जमखींबाबतची माहितीही कळू शकली नाही. याप्रकरणी जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या दुर्घटनेत पोलीस चौकशी सुरू आहे. Ravindra Waikar car Accident |
लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी वायकरांचा विजय
रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा पराभव केला होता. अवघ्या ४८ मतांनी वायकरांचा विजय झाला होता.
यानंतर किर्तीकर यांनी मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करत वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपद मिळाले. Ravindra Waikar car Accident |
हेही वाचा:
“दहा बायका करा पण कुणाचा खून करु नका”; वडेट्टीवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा





