खासदार राजीव रंजन जेडीयुचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
Updated On:

नवी दिल्ली – खासदार राजीव रंजन यांची जेडीयु पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते ललनसिंह या नावानेही ओळखले जातात. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आर.सी.पी. सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारीणीत अनेक महत्त्वाचे ठरावही करण्या आले आहेत.
त्यात केंद्राने देशात जातनिहाय जनगणना करावी या मागणीचाही ठराव करण्यात आला आहे. अशा स्वरूपाची जनगणना करण्यास भाजप तयार नाही असे सांगितले जात आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कोणताही नवीन कायदा करण्यासही जेडीयु पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विरोध करण्यात आला.





