पतंग पकडण्याच्या नादात बोरवलेमध्ये पडलेल्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू, 16 तास चालले बचावकार्य

Guna Borewell Rescue Accident: राजस्थानच्या कोटपुतली येथे 3 वर्षांची मुलगी बोरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली होती. राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेशमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या गुना येथे 10 वर्षीय सुमित नावाचा मुलगा बोरवेलमध्ये अडकून पडला होता. अखेर 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुमित 39 फूट खोल बोरवेलमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी 45 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
#WATCH | Guna, Madhya Pradesh: The 10-year-old boy, Sumit who fell into a borewell in the Janjali area of Raghogarh yesterday has been taken out and sent to a hospital. Details awaited. pic.twitter.com/5rSjIsv48j
— ANI (@ANI) December 29, 2024
पतंग पकडण्याच्या नादात धावत असताना हा मुलगा बोरवेलमध्ये पडला. बोरवेल 140 फूट खोल असून, मुलगा 39 फुटांवर अडकला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व बचाव पथकाने मुलाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली.
मुलाला श्वास घेण्यास समस्या येऊ नये यासाठी पाईपच्या सहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मुलाला बाहेर काढण्यासाठी मशीन्स आणि हाताने 45 फुट खोल खड्डा खोदण्यात आला व अखेर 16 तासांनी त्याला बाहेर काढले. उपचारासाठी मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.





