Delhi MCD Elections 2022 : आपच्या आरोपांना गंभीर यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “केजरीवाल मुख्यमंत्री नाही, तर…”

नवी दिल्ली- दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे राजधानी दिल्लीतील सर्व 7 खासदार प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यांनी प्रचाराची राळ उडवली आहे. त्यातच पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी कसोटीपटू गौतम गंभीर यांनी आम आदमी पक्षाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गंभीर हे संसदेत कमी आणि कॉमेंट्री बॉक्समध्येच जास्त दिसतात अशी टीका आपने त्यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना गंभीर म्हणाले की, जेव्हा दिल्ली बुडत होती तेव्हा विपश्यना करण्यासाठी मी नाही तर अरविंद केजरीवाल गेले होते.
प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद करत मुलांना सुटी देण्यात आली तेव्हा गुजरातमध्ये मी नाही तर केजरीवाल प्रचार करत होते. ते कायम प्रचारातच असतात. त्यांना मुख्यमंत्री म्हणणे चुकीचे ठरेल. ते तर दिल्लीचे प्रचारमंत्री आहेत.
PFI ban : ‘पीएफआय’वरील बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा
ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा एकच हेतू आहे तो म्हणजे लोकांची प्रामाणिकपणे सेवा करणे. गेल्या 15 वर्षांत भाजपने दिल्ली महापालिकेत काय केले याची लोकांना कल्पना आहे. आम्ही खोटे दावे करत नाही आणि प्रचारासाठी जाहीरताबाजीवर लाखो रूपयेही खर्च करत नाही.





