पिंपरी | खासदारकी लिंगायत समाजासाठी समर्पित – खासदार गोपछडे

निगडी, (वार्ताहर) – मला खासदारकी मिळाली ती कारसेवक किंवा भाजपा कार्यकर्ता, राज्याचा उपाध्यक्ष म्हणून नाही तर मी लिंगायत समाजाचा एक घटक असल्याने पक्षाने ती मला दिली आहे.त्यामुळे समाजाची सेवा करण्यासाठी ही खारदारकी समाजाला समर्पित करीत असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे नवनार्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले.
बसव सेवा ट्रस्ट भोसरी, पुणे यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार चिंचवड येथील बर्ड व्हली सभागृहात आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, उपाध्यक्ष अमरनाथ माना, सचिव चंद्रशेखर गाणिगेर, माधव शिनगारे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार गोपछडे, त्यांच्या पत्नी चेताना गोपछडे यांचा महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा, मूर्ती, वचन साहित्य ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भारत सरकारच्या संरक्षण खात्याचे टेंडर कसे भरावे, कोण कोणते नवीन पेटंट उपलब्ध आहेत आणि उद्योग कसा वाढवावा, पेटंट घेणे, संशोधन करणे आणि वस्तू उत्पादन करणे याविषयी डीआरडिओचे सेवा निवृत्त ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी मार्गदर्श केले. या वेळी चेतना गोपछडे यांनी सत्काराला उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना पाहून माहेरी आल्या सारखे वाटत आहे.





