“आमदार पैसे घेऊन फुटले आणि…”; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

MLC Election On Jitendra Awhad| विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. तर, महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले असून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे मत फुटल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हंटले जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये?
या निवडणुकीचा निकाल काल रात्री जाहीर झाला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत फुटलेल्या आमदारांनी किती पैसे मिळाले याबाबात सांगितले आहे. “आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही.”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, “या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय. पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार?” MLC Election On Jitendra Awhad|
“यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल. या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे,” असेही आव्हाड यांनी म्हंटले. MLC Election On Jitendra Awhad|
“पाच कोटी रूपये आणि १०० कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत. तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप , अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकला नाही. म्हणून तुम्ही १७ वरच अडकले. तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधानपरिषद जिंकली आता विधानसभा जिंकू, हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत,” असे म्हणत विधानपरिषद निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. MLC Election On Jitendra Awhad|
हेही वाचा:





