Newasa News : खासदार भाऊसाहेब वाकचौरे राजमुद्रा ग्रुपच्या गणरायाच्या चरणी नतमस्तक; मंगलमय वातावरणात महाआरती संपन्न
गणरायाच्या (Newasa News) जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असतानाच, या उत्साहात भर घालण्यासाठी थेट शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले.

Newasa News : नेवासा येथील राजमुद्रा ग्रुपच्या सार्वजनिक गणेश मंडळात सोमवारी (दि. २१) भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. गणरायाच्या (Newasa News) जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असतानाच, या उत्साहात भर घालण्यासाठी थेट शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले. खासदार वाकचौरे यांच्या शुभहस्ते बाप्पाची महाआरती मोठ्या भक्तिभावात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
आरतीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना खासदार वाकचौरे यांनी मंडळाच्या कार्याचे तोंडभरून (Newasa News) कौतुक केले. “सार्वजनिक गणेशोत्सव ही केवळ परंपरा नसून आपली मूळ संस्कृती आहे. राजमुद्रा ग्रुपसारख्या तरुणांच्या फळीने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत अशा शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
या सोहळ्याला बाळासाहेब पवार, मुकिंदपूरचे सरपंच दादा निपुंगे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे, नितीन जगताप, राजेंद्र बोलके, अमित मेहर, वेदांत बोलके, प्रतिक निपुंगे, तन्मय दरंदले यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमुद्रा ग्रुपने (Newasa News) साकारलेला नयनरम्य देखावा आणि भव्य विद्युत रोषणाई संपूर्ण परिसरातील भाविकांचे डोळे दिपवून टाकत आहे. आरती संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा ग्रुपच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.






