Bajrang Sonawane : ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत. नुकतेच गेवराईमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली. या टीकेला आता सोनावणे यांनी जशास तसं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. हाकेंनी सोनावणे यांच्यावर टीका करताना थेट त्यांच्या शिक्षणाकडे बोट दाखवलं होतं. माजलेल्या लोकांना घरी बसवायचे आहे. चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती रे असं म्हणत हाकेंनी सोनवणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या टीकेला खासदार बजरंग सोनावणे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची असेल, म्हणून ते सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त आहेत, असा मिश्किल टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. या अगोदर ओबीसी नेते लक्ष्मम हाकेंनी आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यावर देखील टीकास्त्र डागले होते. आता त्यांनी खासदार बजरंग सोनावणे यांना लक्ष्य केलं आहे. पुन्हा वादाच्या भोवऱ्यात बीडमधील गेवराई येथील ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाकेंनी मुंबईला लाखोंच्या संख्येने जायचे आहे. आपली माणसं तारीख ठरवतील. इथून पुढे महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय? असं म्हटलं आहे. मात्र, त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना यापुढे आम्ही दांडकं नाही तर कोयते काढू असा थेट इशारा दिला आहे. यामुळे त्यांनी केलेल्या या विधानावरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आरक्षण संपवण्याचा घाट: हाकेंचा गंभीर आरोप बंजारा समाजानेही आता वेगळं आरक्षण न मागता ओबीसींची एकजूट राखावी, कुणीही ओबीसींमध्ये फूट पडेल असं कृत्य करू नये, असंही हाके म्हणाले आहेत. आमचा मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे, ते जीआर मागे घेतील. पण आताचा मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारा आहे. तसेच लक्ष्मण हाकेंनी यावेळी बोलताना आमच्या हक्काचं ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. हेही वाचा : हुर्रियत कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष अब्दुल गनी भट यांचे निधन ; ओमर अब्दुल्ला यांच्याकडून दुःख व्यक्त