Satara | सकल हिंदू समाजाचे सातार्यात आंदोलन

सातारा, (प्रतिनिधी) – ज्ञानेश महाराव हा हिंदू धर्मीयांच्या आराध्यदैवतांबाबत वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्ये करत असताना, कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेल्या शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी मौन बाळगले होते.
हिंदूंचा होणारा अपमान ते पहात बसले होते. म्हणजेच हिंदू देवतांच्या अपमानाला त्यांची मूक संमती होती. शरद पवार व शाहू महाराज हे हिंदूद्वेष्टे आहेत. त्यांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे पोवई नाका येथे गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
आजपर्यंतचा इतिहास पाहता शरद पवार हे नेहमीच हिंदूंच्या देवतांचा, आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील लाखो हिंदू बंधू-भगिनींचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा वारंवार अपमान करतात.
पवारांनी हिंदू द्वेष कमी करावा, अन्यथा त्यांना सातार्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि हिंदू एकदा आंदोलनाचे विक्रम पावसकर आणि आंदोलकांनी दिला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतीश ओतारी, अभिजित बारटक्के, अजय बर्गे, विजय पवार, महेश पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद आफळे, महेश शिवदे, श्रीधर कुलकर्णी, अशोक रेमजे, प्रकाश शहाणे, विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल पवार, बजरंग दलाचे विक्रांत विभूते,
दुर्गा वाहिनी शक्तिसाधनाच्या वैष्णवी ताटे, श्रद्धा माने, देवयानी माने, श्रुतिका जाधव, सुनिशा शहा, रीना भणगे, कुंजा खंदारे, गौरी गुरव, अश्विनी हुबळीकर, पायल जाधव, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, किशोर पंडित, धनंजय जांभळे, सचिन साळुंखे,
चिन्मय कुलकर्णी, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, शैलेंद्र कांबळे, रवी आपटे, राज सोनवले, सुनील लाड, सचिन पाटील, गणेश पवार, भरत रावळ, संदीप जोंधळे, यशोवर्धन मुतालिक, अनिकेत निकम, विक्रम बोराटे, भाजप, मनसे, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.





