satara | वाठार स्टेशनला पोलिसांचे संचलन
Updated On:

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, अंबवडे चौक येथे सीमा सुरक्षा दल आणि वाठार स्टेशन पोलिसांनी बुधवारी संचलन केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या आदेशाने सीमा सुरक्षा दल आणि वाठार पोलिसांनी वाठार स्टेशन, वाग्देव हायस्कूल, एसटी स्टँड, पिंपोडे बुद्रुक, अंबवडे चौक बाजारपेठेतून सशस्त्र संचलन केले.
वाठार स्टेशनचे सपोनि अशोक हुलगे, पोलीस कर्मचारी, सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी, जवान व होमगार्ड संचलनात सहभागी झाले होते. निवडणूक कालावधीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.





