‘सीआरपीएफ’चे सहकारनगर परिसरात संचलन
Updated On:

शहर पोलिसांना विश्रांती मिळण्यासाठी उपाययोजना
पुणे – सलग दोन महिने बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी राज्यभरात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांना (सीआरपीएफ) बंदोबस्तासाठी पाचारण करण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. त्यानुसार पुण्यातही “सीआरपीएफ’ची तुकडी तैनात राहणार आहे. या तुकडीने आज सहकारनगर परिसरात पथसंचलन केले.
“सीआरपीएफ’च्या एका तुकडीत 120 जवान आहेत. पुणे शहरातील 169 भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. प्रतिबंधित भागासह शहराच्या वेगवेगळ्या भागात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. “सीआरपीएफ’चे जवान पोलिसांना सहाय्य करणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.





