गिर्यारोहकांची माऊंट युनम मोहीम यशस्वी

पुणे – स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून शिखरमाथ्यावर तिरंगा फडकावून स्वच्छंद ऍडव्हेंचर फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी माऊंट युनम मोहीम यशस्वी केली.

पहाटे 3 वा. चढाईला सुरुवात करण्यात आली आणि सकाळी 10 वाजता अनिल बोंडे, तृप्ती जोशी आणि मोहिमेचा नेता अनिकेत कुलकर्णी यांनी माऊंट युनम या 6,113 मीटर उंच शिखराचा माथा गाठला. तर आशिष शिंदेनी त्याच्या पहिल्या हिमालयीन मोहिमेत उत्तम कामगिरी करत 5,360 मीटरपर्यंत मजल मारली, मात्र शारीरिक तक्रारींमुळे त्याला मागे फिरावे लागले. हिमाचल प्रदेशातील माऊंट युनम हे शिखर खडतर मार्ग आणि सरळ कठीण चढाईसाठी आव्हानात्मक आहे.

अत्यंत अनिश्‍चित हवामान, बोचरे वारे आणि अतिउंचीवरील विरळ हवा ही येथील आव्हाने आहेत. रूट ओपनिंग, लोड फेरी, कॅम्प मॅनेजमेंट आणि कुकिंग अशी सर्वच कामं गिर्यारोहकांनी स्वबळावर केली हे या मोहिमेचे वैशिष्ट्ये होती. या मोहिमेसाठी फाउंडेशनच्या 4 गिर्यारोहकांचा संघ 6 ऑगस्टला पुण्याहून मनालीला रवाना झाला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×