कान चित्रपट महोत्सवात मौनी रॉयचा जलवा
Updated On:

कान : 78 व्या कान चित्रपट महोत्सवात भारतीय सेलिब्रिटींची उपस्थिती सातत्याने वाढत आहे. उर्वशी रौतेला, जैकलीन फर्नांडिस आणि नितांशी गोयल यांसारख्या कलाकारांनी यंदा कानच्या रेड कार्पेटवर आपली छाप पाडली आहे. आता यात छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयची भर पडली आहे.

ब्लॅक ड्रेसमध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज –
मौनी रॉयने कान चित्रपट महोत्सवात आपल्या सौंदर्याचा ठसा उमटवला. काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. केस मागे बांधून छोटा जूडा आणि गळ्यात नाजूक नेकलेस घालून तिने आपला लूक आकर्षक केला. या साध्या पण प्रभावी लूकमुळे मौनीचा ग्लॅमरस अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या विविध पोझमधील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून तिचे कौतुक होत आहे.






