पुणे जिल्हा | अकलूजमध्ये मोटारसायकली पेटवण्याचे सत्र
Updated On:

अकलूज, (प्रतिनिधी) – अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दित गेल्या चारपाच दिवसांत आठ मोटारसायकली पेटवून देवून सुमारे तीनचार लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गस्त चालू असताना देखील असे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कोणीतरी जाणूनबुजून असे प्रकार करीत आहे.
डीवायएसपी नारायण शिरगावकरव, वरीष्ठ निरीक्षक भानुदास निंबोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बबनराव साळुंखे, पीएसआय श्रीकांत निकम व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.





