Moshi Accident – भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे नाशिक महामार्गावरील मोशीगाव चौकात शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. भगवान सिद्धार्थ साखरे (वय २९) असे अपघातात मृत्यूमुूखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बिलाल अस्लम बारुदवाले (वय २१, रा. शिलवंतवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद प्रकाश गायकवाड (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, मोशी, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. १३) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दाजी भगवान साखरे हे दुचाकीवरून मोशी टोलनाक्याकडे जात होते. मोशी गाव चौकात आल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे ते रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.