Buldhana News | बोगस मतदार प्रकरणावरून विरोधक एकवटले असून त्याविरोधात निवडणूका पुढे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यातच आता सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक बोगस मतदार झाल्याचा आरोप केला आहे. मतदार यादीतील घोळाच्या अनुषंगाने आमदार गायकवाड यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. मतदार याद्यांमध्ये एकाच मतदाराची दोन-दोन नावे आली आहेत. चार हजार मतदारांची नावे याद्यांमध्ये दोनवेळा असल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच निवडणूक आयुक्तांनाही याची माहिती दिल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. अनेक लोक जिल्ह्यात तीस, तीस वर्षे राहिले, अधिकारीही राहून गेले, त्यांची देखील नावे याद्यांमध्ये तशीच आहेत. ज्यांचे निधन झाले, अशांची नावेही कायम आहेत. हा आकडा जिल्ह्यात लाखाहून अधिक आहे. Buldhana News | ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करणे गरजचे संजय गायकवाड यांनी निवडणुक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ केली जात असून मृत व्यक्तींची आणि नियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची नावं वर्षांनुवर्ष यादीतून काढण्यात आलेली नाहीत. तसंच मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. Buldhana News | दरम्यान, मतदार याद्या पारदर्शक व्हाव्यात, मतदारांच्या नावांमधील घोळ थांबवण्यासाठी मृत्यू दाखला निवडणूक आयोगाशी जोडला तर कुणाचा मृत्यू झाला हे समजेल आणि ते नाव वगळले जाईल. शिवाय आयोगाशी आधार लिंक केल्यास बोगस मतदारांची अर्थात दोन-दोन नावे येऊ शकणार नाहीत, असा पर्याय आमदार गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला सुचविला आहे. विरोधकांची निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी गेल्या महिन्याभरापासून व्होटचोरी आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदारयाद्यामधील घोळ समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत याद्यामधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. Buldhana News | हेही वाचा: भूकंपाच्या धक्क्यांनी ‘हा’ देश हादरला ; ६.१ रिश्टर स्केलची तीव्रता