Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा? मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण; महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
Monsoon Update : आठवडाभर अनेक भागांमध्ये उष्णतेची परिस्थिती गंभीर राहू शकते.

Monsoon Update : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल केरळच्या दिशेने होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा? मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण; महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
१६ मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अत्यंत अनुकूल आहे. १६ मे पर्यंत साधारणपणे मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल होऊ शकतो. तर ३ ते ५ जून दरम्यान केरळ आणि तिथून तो तळ कोकणात दाखल होईल. महाराष्ट्रात मान्सून साधारणपणे ९ ते १० जूनपर्यंत दाखल होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं म्हटलं आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनच्या आगेकूचला गती मिळत आहे. मान्सूनच्या हालचालीसाठी समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाब यांसारखे घटक सध्या अनुकूल असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. Monsoon Update
आठवडाभर अनेक भागांमध्ये उष्णतेची परिस्थिती गंभीर
मात्र आठवडाभर अनेक भागांमध्ये उष्णतेची परिस्थिती गंभीर राहू शकते. दुपारी कडकडीत ऊन आणि संध्याकाळी पावसाचं धुमशान अशी परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळू शकते. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागांत ताशी ५० किलोमीटरपर्यंत वेगवान वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
साधारण 13 ते 19 मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, माहे, पद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात 13 ते 17 मे दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर दुसरीकडे, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देखील गारपीट, अवकाळी पावसाचं संकट ओढवलेलं आहे. अवकाळी पाऊस पडत असला तरी उष्ण वाफाही वाढत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. Monsoon Update
हेही वाचा:





