Monsoon Update : 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

Monsoon Update – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 31 मेपर्यंत मॅान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मॅान्सुनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एखाद दोन दिवस पुढे देखील जाऊ शकतात. मान्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये धडकणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
Forecast for the Onset Date of 2024 Southwest Monsoon over Kerala was released by IMD. https://t.co/PcfQ0iuphi pic.twitter.com/CbByUM4k15
— Dr. Satyaban B Ratna (@satyaban14) May 15, 2024
मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 12 जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कधी येणार, याचे वेध आता सर्वांना लागले आहेत.





