राज्यातून 24 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास
Updated On:

पुणे – राज्यात गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पाऊसाचा आता लवकरच परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
हवामान विभागातर्फे महाराष्ट्रातून 24 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असे संकेत देण्यात आले आहे.
मात्र त्यापूर्वी 20 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.





