Maharashtra Weather : महाराष्ट्रातून मान्सूनची ‘एक्झिट’; मराठवाडा, विदर्भात पावसाची मोठी तूट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील यंदाच्या मान्सून हंगामाचा मुख्य कालावधी (१ जून ते ३० सप्टेंबर) अधिकृतरीत्या संपला असून राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील यंदाच्या मान्सून हंगामाचा मुख्य कालावधी संपला असून, राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पुणे वेधशाळेने ३० सप्टेंबरला मान्सूनचा मुख्य हंगाम संपल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राज्यातील काही भागांत पुढील एक-दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. (Maharashtra Weather)
पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा मुख्य कालावधी मानला जातो. हा कालावधी आता अधिकृतरीत्या संपला आहे. राज्यातून पाऊस पूर्णपणे नाहीसा झालेला नसला, तरी मान्सूनचा मुख्य हंगाम संपला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Weather)
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे १९ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विभागनिहाय पाहता मराठवाड्यात पावसाची तूट सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather)
मराठवाड्यात सुमारे ४० टक्के तूट नोंदवण्यात आली असून, गेल्या काही आठवड्यांतील कमी पावसामुळे खरीप पिकांबाबत चिंता निर्माण झाली आहे. विदर्भातही पावसाची कमतरता जाणवत आहे. (Maharashtra Weather)
पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता
१ आणि २ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्याचे सरासरी तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather)
मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत तापमान तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे. १ आणि २ ऑक्टोबरनंतर राज्यात पावसासाठी अनुकूल अशी नवीन हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather)
कोणत्या जिल्ह्यात किती पावसाची तूट?
कोकण व पश्चिम महाराष्ट्र
मुंबई उपनगर : ९%
ठाणे : ११%
पालघर : २१%
रायगड : ६%
रत्नागिरी : १६%
सिंधुदुर्ग : ३६%
पुणे : १४%
नाशिक : ३३%
कोल्हापूर : १५%
सातारा : २८%
सांगली : २४%
सोलापूर : ५८%
उत्तर महाराष्ट्र
धुळे : १९%
जळगाव : ११%
नंदुरबार : ३९%
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर : १९%
धाराशिव : ४५%
बीड : ५१%
लातूर : ३८%
जालना : ४८%
परभणी : ४०%
नांदेड : ३४%
हिंगोली : ४९%
विदर्भ
बुलढाणा : १७%
वाशीम : ३५%
अकोला : ३७%
अमरावती : ४०%
यवतमाळ : २३%
वर्धा : २८%
नागपूर : २८%
चंद्रपूर : २९%
भंडारा : १६%
गडचिरोली : १५%
एकूणच, मान्सूनचा मुख्य हंगाम संपत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची स्थिती शेतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काही दिवसांत स्थानिक पातळीवरील पाऊस आणि तापमानातील बदलांकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष राहणार आहे. (Maharashtra Weather)





