मोनिका बेदी ‘करण-अर्जुन’मध्ये सलमान खानसोबत दिसणार होती पण त्या एका चुकीने…

मुंबई – मोनिका बेदीने ९० च्या दशकात खूप प्रसिद्धी मिळवली. ती अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली, परंतु एक लोकप्रिय चित्रपट तिच्याकडून सुटला होता. खरं तर, अलीकडेच मोनिका बेदीने तिच्या कामाच्या अनुभवाबाबत आणि ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल आपलं मत मांडलं आहे. ममता कुलकर्णीची भूमिका तिला पहिल्यांदा ‘करण अर्जुन’मध्ये ऑफर करण्यात आली होती.
मोनिका बेदीने खुलासा केला की, “मी माझ्या मित्रांसोबत दिग्दर्शक सुभाष घई यांच्या होळीच्या पार्टीला गेलो आणि तिथे राकेश रोशनला भेटले. थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांनी मला कार्ड दिले आणि फोन करण्यास सांगितले. पण मला वाटले की ते सहज बोलले असावे.” म्हणून मी ते कार्ड फाडून फेकून दिले. काही महिन्यांनी माझ्या मॅनेजरने मला विचारले, ‘तू राकेश रोशनला का भेटली नाहीस? तूला ते कास्ट करणार होते. करण अर्जुन चित्रपटात सलमान खानच्या विरोधात कास्टसाठी त्यांनी कॉल करण्यास सांगितले होते, तेव्हा माझ्या लक्षात आले की, मला तर हे माहितच नव्हते.
करण अर्जुन चित्रपटातबाबत सांगायचं झाल्यास या चित्रपटात शाहरुख खान, सलमान खान, काजोल आणि ममता कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. 1995 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट केवळ ब्लॉकबस्टर ठरला नाही तर, या चित्रपटाचे नाव क्लासिक चित्रपटांमध्ये देखील समाविष्ट आहे.





