पुणे, पिंपरीतील एटीएममध्ये खडखडाट
Updated On:

पुणे/पिंपरी – बॅंक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपामुळे व्यवहारावर परिणाम झाला आहे. शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांचे व्यवहार मागील तीन दिवसांपासून ठप्प असल्यामुळे एटीएममध्येही खडखडाट आहे.
युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सच्या नेतृत्वाखाली बॅंक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला होता. यामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनांनीही सहभाग नोंदवला होता. परिणामी शुक्रवार व शनिवार दोन दिवस बॅंकेचे कामकाज ठप्प होते.





