मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आली आहे. जॅकलीनला मुंबई विमानतळावर रविवारी संध्याकाळी ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी होणार आहे. सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरच्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये नाव आल्याने तिला देश सोडण्यापासून रोखण्यात आले. अडचणीत सापडलेल्या जॅकलिनच्या मदतीसाठी आता बॉलिवूडचा भाई सलमान खान मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं काय आहे प्रकरण सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी होणार आहे. जॅकलिनला 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने समन्स बजावले आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.