Viral Video Monalisa : सिनेमाची अॅाफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला; सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय नवा Video

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात अनेकांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांना प्रसिद्ध मिळाली. या कुंभमेळ्यात एका तरुणीने हजेरी लावली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली. तिचं नाव मुनालिसा… महाकुंभात सावळा रंग आणि सोनेरी डोळ्यांच्या या अप्सराने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतले. या महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकणाऱ्या मोनालिसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता मोनालिसाला सिनेमाची अॅाफर मिळाली असून यामुळे तिचा तोरा बदलला आहे.
तसे महाकुंभ मेळ्यातील मोनालिसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मोनालिसा आता चर्चेचा विषय बनली आहे. तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहमी सालस दिसणारी मोनालिसाचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाच दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने निळ्या-जांभळ्या रंगाची साडी आणि बॉडीकॉन व्हाईट टॉप परिधान केल्याचे दिसत आहे.या व्हिडिओला लाइक आणि कमेंट्स येत असून मोठ्य़ा प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
महाकुंभमेळ्यात वडिलांच्या मदतीसाठी माळा विकणारी 16 वर्षीय तरुणी मोनालिसा हिने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित केले. सावळा रंग आणि सोनेरी डोळ्यांच्या या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. तिचा साधेपणा आणि सुंदरतेने सर्वांनाच थक्क केले. यानंतर तिला ब्रँड आणि चित्रपटांच्या ऑफर येत आहे. मोनालिसाने एक चित्रपट साईन केल्याची माहिती आहे. दरम्यान सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ समोर आला आहे.





