‘मम्मी गेली… मम्मी गेली’, चिमुकलीचा आक्रोश; कल्याणमधील मनं हेलावणारी घटना

Building Collapse | कल्याणमध्ये पूर्व भागातील चिकणी पाडा परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केलं. चार तासांच्या अथक प्रयत्नांतर या इमारतीमधून १२ जणांना बाहेर काढण्यात यश आले.
या बचावकार्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वरच्या मजल्यावर अडकलेली एक 14 वर्षांची मुलगी रडताना दिसत आहे. या दुर्घटनेत ही मुलगी थोडक्यात बचावली पण तिच्या आईचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी आले तेव्हा ही मुलगी खिडकीत उभी होती. ती बाहेरच्या लोकांना रडत रडत ‘मम्मी गेली… मम्मी गेली’, असे सांगत आहे.
ग्रील पकडून राहिल्यामुळे ही चिमुरडी थोडक्यात बचावली. अग्निशमन दलाच्या जवानाने शिडी लावून या मुलीला सुखरूपपणे बाहेर काढलं. मात्र घाबरलेल्या या मुलीची अवस्था पाहून परिसरातील लोकांनी देखील हळहळ व्यक्त केली.
कल्याण पूर्वमधील मंगलराघोनगर परिसरात चाळीस वर्षे जुन्या असलेल्या सप्तशृंगी को ऑपरेटिव्ह सोसायटी नावाची ४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचे काम सुरू होतं. पण मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक या इमारतीचा चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब कोसळल्यानंतर थेट तळमजल्यापर्यंत येऊन आदळला. त्यामुळे तळ मजल्यापर्यंत घरात राहणारे कुटुंब ढिगाराखाली दबले गेले. Building Collapse |
जेवून झोपला पण मृत्यूने गाठलं
दरम्यान, या इमारतीमध्ये जितेंद्र गुप्ता आणि व्यंकट चव्हाण हे चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचे काम करत होते. मंगळवारी दुपारी काम केल्यानंतर जितेंद्र गुप्ता हा जेवण्यासाठी बाहेर गेला. तर त्याचा मित्र व्यंकट चव्हाण हा त्याच ठिकाणी जेवला आणि झोपला. मात्र त्याचवेळी ही इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून व्यंकट चव्हाणचा मृत्यू झाला होता. Building Collapse |
मृत्यू झालेल्यांची नावं
प्रमिला साहू – वय 58
नामस्वी शेलार -वय 1.5
सुनीता साहू – वय 37
सुजाता पाडी – वय 32
सुशीला गुजर – वय 78
व्यंकट चव्हाण – वय 42
जखमीची नावं
अरुणा रोहिदास गिरणारायन -48 वय
शरवील श्रीकांत शेलार – 04 वय
विनायक मनोज पाधी – 4.5 वय
हेही वाचा:





