‘मॉम टू बी’ दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस लुक; ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये वेधले साऱ्यांचे लक्ष

Kalki 2898 AD Pre Release| ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी मुंबईत या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये संपूर्ण स्टार कास्टने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ‘मॉम टू बी’ दीपिका पदुकोण या कार्यक्रमाला हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय चित्रपटाचे मुख्य कलाकार प्रभास, अमिताभ बच्चन, राणा डग्गुबती आणि कमल हासन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले. या इव्हेंटचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमिताभ बच्चन यांची सहकलाकारांसोबतची धमाल मस्ती देखील पाहायला मिळाली.
View this post on Instagram
दरम्यान, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटावर जवळपास 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दीपिका पदुकोण ही ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात दीपिका अॅक्शन भूमिकेत दिसणार असून तिला पाहण्यासाठी चाहतेहीउत्सुक आहेत. ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, ब्रह्मानंदम, राणा डग्गुबती, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली सी अश्विनी दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
हेही वाचा:





