Mohan Joshi : मोहन जोशी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती
Mohan Joshi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांची AICC सचिवपदी नियुक्ती. त्यांच्याकडे कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Mohan Joshi : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कर्नाटक राज्याच्या सहप्रभारीपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नियुक्ती केली असून, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी त्याची घोषणा केली.
जोशी हे गेल्या ४५ वर्षांपासून काँग्रेस संघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी पुणे शहर युवक काँग्रेस, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्षपद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि वरिष्ठ उपाध्यक्षपद अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच १२ राज्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणून काम केले आहे. पक्षाने सोपविलेली नवीन जबाबदारी समर्थपणे पार पाडू आणि वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया जोशी यांनी व्यक्त केली.





