Mohan Charan Majhi : ओडिशातील महिलांच्या खात्यात ‘सुभद्रा’ योजनेचे 5,163 कोटी वर्ग; मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची घोषणा
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी (Mohan Charan Majhi) राज्यातील १.०३ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना सुभद्रा योजनेच्या पाचव्या हप्त्यांतर्गत ५,१६३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली.

Mohan Charan Majhi : ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी (Mohan Charan Majhi) राज्यातील १.०३ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना सुभद्रा योजनेच्या पाचव्या हप्त्यांतर्गत ५,१६३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली. नयागड जिल्ह्यातील लाठीपाडा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलताना माझी यांनी या योजनेचे वर्णन महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असे केले.
२,२१,०५४ महिलांना पहिल्यांदाच ही मदत मिळाली आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी (Mohan Charan Majhi) ही मदत देताना, सरकारचा प्रमुख म्हणून एका भावाचे कर्तव्य पूर्ण केल्यासारखे वाटत असल्याचे माझी म्हणाले. मात्र, केवळ आर्थिक मदतीमुळे महिलांचे सक्षमीकरण होऊ शकत नाही, यावरही त्यांनी भर दिला.
महिलांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले पाहिजे. त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा, असे सांगून माझी म्हणाले की, जवळपास ८० टक्के लाभार्थ्यांनी ही मदत केवळ दैनंदिन गरजा भागवण्यासाठी न वापरता दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा, व्यवसाय आणि विकासकामांमध्ये गुंतवली आहे. सुमारे ८७.१९ टक्के लाभार्थ्यांनी ही मदत अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.
२७ लाख लखपती दीदी
माझी म्हणाले की, २७ लाख लखपती दीदी तयार करून ओडिशाने (Mohan Charan Majhi) देशात विक्रम प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री कन्या विवाह योजना आणि मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. ओडिशाच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणासाठी आणि संबंधित योजनांसाठी १,२२,७६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.






