‘पटनायक सरकारने माझ्या हत्येचा कट रचला होता’ ; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचा BJD वर गंभीर आरोप

Mohan Charan Majhi । ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मागीलनवीन पटनायक सरकारवर गंभीर आरोप केलेत. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी,”पूर्वीच्या बीजेडी सरकारने आपल्या हत्येचा कट रचला होता” असा दावा केला आहे. मात्र बीजेडीने मुख्यमंत्र्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोहन चरण माझी यांनी प्रथमच त्यांच्या गृहजिल्ह्या केओंझरला भेट दिली. यावेळी ते त्यांच्या रायकाळा या गावीही गेले. यादरम्यान त्यांनी नवीन पटनायक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री मोहन माझी यांचा बीजेडीवर आरोप Mohan Charan Majhi ।
2019 ते 2024 या पाच वर्षांत त्यांनी विधानसभेत अनेक मुद्दे मांडले आणि सरकारला गोत्यात उभे केले, असे मुख्यमंत्री मोहन माझी म्हणाले. ऑक्टोबर 2021 मध्ये दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, “बदला घेण्यासाठी मागील सरकारने मला मारण्याची योजना आखली होती. त्यांनी मांडुआ, केओंजर येथे बॉम्बस्फोट करून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण मी वाचलो. लोकांच्या दयाळूपणाने आणि देवाने मला वाचवले.”असा मोठा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
मी कोणाला घाबरत नाही Mohan Charan Majhi ।
मुख्यमंत्री माझी यांनी यावेळी, “मी कोणाला घाबरत नाही असे म्हणत “जेव्हा माँ तारिणी माझ्यासोबत असते, तेव्हा भगवान बलदेवजी माझ्यासोबत असतात. भगवान जगन्नाथ माझ्यासोबत असतात. झुमपुराची प्रमुख देवता माँ दुर्गा माझ्यासोबत असते आणि मला लोकांचा आशीर्वाद असतो, मग मला का भीती वाटवी ?” असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी लोकांनी मला विधानसभेत निवडून दिले आहे, असेहीत्यांनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी -बीजेडी
तर दुसरीकडे बीजेडीने मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. बीजेडी नेते प्रताप देब यांनी, “मुख्यमंत्र्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की ते आता विरोधी पक्षात नाहीत. आता ते ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी किमान आपल्या पदाची प्रतिष्ठा अबाधित आहे याचा विचार करायला हवा.” असे म्हणत त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.





