बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असललेल्या हल्ल्यांवर मोहन भागवतांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले…

Mohan Bhagwat | आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी बांगलादेशमध्ये होत असलेल्या हल्ल्यांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, “भारताची परंपरा राहिली की आहे, शेजारी देशात मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून तेथे राहणाऱ्या हिंदू बांधवांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही. जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पिडितांसाठी आपण हे करतो.”
#WATCH नागपुर (महाराष्ट्र): आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने कहा, “हम अपना 78वां स्वतंत्रता दिन पूरा कर रहे हैं….देश में इस स्वतंत्रता के लिए बलिदान करने वाला समूह और उनके पीछे खड़े होने वाले समाज ये दोनों बाते जब बनी तब हमें स्वतंत्रता प्राप्त हुई… हमने जो बड़ी मेहनत से… https://t.co/9QVq1dRZtm pic.twitter.com/dRISZNAcv9
— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2024
“शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता सहन करावी लागत आहे. त्या घटनेचा हिंदूंना त्रास होत आहे. त्यांना काही कष्ट होऊ नये, त्यांच्यावर अत्याचार होऊ नये, याची जबाबदारी एक देशाच्या नाते आपल्यावर आहेच. केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदूंची काळजी करायला हवी. हे सरकार करेलच, पण त्यासाठी समाजालाही सरकारच्या मागे उभे राहावे लागेल,” असे सरसंघचालक म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले, “आम्ही आमचा 78 वा स्वातंत्र्यदिन पूर्ण करत आहोत. देशात या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा समाज हे दोन्ही गट तयार झाले तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. केवळ चिंतन करून होत नाही. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. स्वातंत्र्य मिळालेली ती पिढी गेली पण येणाऱ्या पिढीला आपल्या रंगात रंगवून तिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे.”
हेही वाचा:
मराठा आंदोलक आक्रमक; गाडीतून उतरताच जयंत पाटलांना घातला घेरावं





