मराठा आंदोलक आक्रमक; गाडीतून उतरताच जयंत पाटलांना घातला घेरावं

Jayant Patil | मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. अनेकदा राजकीय व्यक्तींना मराठा आंदोलकांकडून घेराव घातला जात आहे. यातच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि घोषणा बाजी केली. शिवस्वराज्य यात्रेसाठी ते लातूर दौऱ्यावर होते.
ध्वजारोहणासाठी जात असताना घातला घेरावं
आज लातूरच्या जय क्रांती महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जात असताना मराठा समाजातील आंदोलकांनी जयंत पाटील यांना अडवत निवेदन दिलं. मात्र मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं जयंत पाटलांनी टाळल्याने आंदोलन आक्रमक झाले.
जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणाबाजीमुळे जयंत पाटील देखील आक्रमक झाले. “मराठा समाजाचा अपमान होत आहे,” असे मराठा कार्यकर्त्यांनी म्हटले. यानंतर पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेराव घातल्यानंतर काल धाराशिव जिल्ह्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही आंदोलकांनी घेरल्याचा पाहायला मिळालं. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेरल्याचं दिसून आलं. Jayant Patil |
सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असतानाच मराठा समाजाचे आंदोलक थेट स्टेजवर
तर शिवस्वराज्य यात्रेवेळी (दि.14) अहमदपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असतानाच मराठा समाजाचे आंदोलक थेट स्टेजवर पोहोचले होते. त्यांनी स्टेजवर सुप्रिया सुळेंचे भाषण थांबवत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला. यावेळी मराठा समाज बांधवांनी स्टेजवर घोषणाबाजी केली आणि सुप्रिया सुळे यांना निवेदनही दिले.
हेही वाचा:
‘काश! मैं भी लड़का होती’; कोलकतामधील घटनेवर आयुष्यमानची कविता वाचून मनं होईल सुन्न…




