‘ही धर्म आणि अधर्माची लढाई, राक्षसांना मारण्यासाठी..’; पहलगाम हल्ल्यावर संघ प्रमुख मोहन भागवत यांची प्रतिक्रिया

Mohan Bhagwat on Pahalgam Attack । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यावर बोलताना त्यांनी,”ही कोणत्याही पंथाची किंवा समुदायाची लढाई नाही. सध्या सुरू असलेला संघर्ष हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे.” असे त्यांनी म्हटले. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना मोहन भागवत बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात बोलताना, “दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर मारले, परंतु हिंदू कधीही असे करणार नाहीत.” असे निक्षून सांगितले. तसेच भागवत मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी यावेळी या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असे आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
‘एक हिंदू कधीही असे करणार नाही’ Mohan Bhagwat on Pahalgam Attack ।
आरएसएस प्रमुख भागात यांनी यावेळी, “लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यात आले आणि त्यांना मारण्यात आले. हिंदू कधीही असे करणार नाहीत.” असेही सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, “युद्ध धर्म आणि अधर्म यांच्यात आहे. आपल्या हृदयात वेदना आहेत. आपण रागावलो आहोत पण वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला शक्ती दाखवावी लागेल. जेव्हा रावणाने आपला हेतू बदलला नाही, तेव्हा दुसरा पर्याय नव्हता. रामाने त्याला सुधारण्याची संधी दिली आणि नंतर त्याला मारले.” असे म्हणत त्यांनी पाकिस्तनाला एक प्रकारे इशाराच दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी “अशा दुर्घटना आणि द्वेषपूर्ण कटांना रोखण्यासाठी समाजात एकता आवश्यक आहे.” असे म्हटले.
‘प्रतिशोध अपेक्षित’ Mohan Bhagwat on Pahalgam Attack ।
ते म्हणाले, “जर आपण एकत्र आलो तर कोणीही वाईट हेतूने आपल्याकडे पाहण्याची हिंमत करणार नाही आणि जर कोणी असे केले तर त्याचे डोळे फोडले जातील. आम्हाला कडक प्रत्युत्तराची अपेक्षा आहे.”
‘गरज पडल्यास आपल्याला ताकद दाखवावी लागेल’
पुढे ते म्हणाले, “द्वेष आणि शत्रुत्व आपल्या स्वभावात नाही पण शांतपणे नुकसान सहन करणे देखील आपल्या स्वभावात नाही. खऱ्या अर्थाने अहिंसक व्यक्तीने शक्तिशाली देखील असले पाहिजे. जर शक्ती नसेल तर पर्याय नाही. परंतु जेव्हा शक्ती असेल तेव्हा ती गरज पडेल तेव्हा ती दिसली पाहिजे.”असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर म्हटले आहे की, “हा भारत आणि मानवतेवर हल्ला आहे. यामध्ये निहत्था आणि निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. देश हे कधीही माफ करणार नाही. पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश अगदी स्पष्ट आहे की हा एक नवीन भारत आहे. दहशतवाद कधीही भारताचा आत्मा तोडू शकत नाही. पंतप्रधान मोदींचा संदेश देशाच्या भावना प्रतिबिंबित करतो.”





